Tuesday, October 2, 2018

Gulabjam Film Review

गुलाबजाम 

 एक मराठी पिक्चर खूप चर्चा ऐकली होती.  जेव्हा स्वतः बघितला तेव्हा मात्र माझे मन बदलले. आपण हिंदी चित्रपट त्यांचा प्रभाव वगैरे बोलत असतो. आज मला ते संपूर्ण पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या पटकथे विषयी मला काही मूलभूत प्रश्न आहेत. आज जेव्हा आपण ऐकतो कि गुलाबजाम म्हणजे तोंडात पाणी पाणी करतो. मला काळात नाही कि आपण  चित्रपट बघायला गेलात कि हलवायाच्या दुकानात. एक माध्यम  वयीन अ-विवाहित महिला कि जी एकटीच राहते आणी काही जेवणाचे डबे पुरवायचे काम करते.  तिची कीर्ती इंग्लंड स्थित तरुणाला कशी कळते? तिचे जवळचे आणि लांबचे नातेवाईक  तिला अशी एकटी सोडून का देतात? तिला स्वतःहोऊन कधी लग्न करावे, समाजात मिसळावे असे का वाटत नाही? आदित्य एक पात्र जे तिच्या कडे गुलाबजाम शिकायला येते, त्याचे आई वडील कुठे आहेत? त्याची फॅमिली कुठे आहे? हे दोन असे सामाजिक घटक कि जे मुळातच कोणत्याही प्रकारे समाजात मिसळत नाहीत. तिसरे पात्र येते ते राधा च्या शाळेतले, तिचा वर्ग मित्र. त्याला ती आवडते, तिथेच डिरेक्टर चा तोल सुटतो आणि डायरेक्टर शेवटी दोघांना एकत्र सिनेमाला जातं दाखवतो.

हा चित्रपट बघताना मला सारखे जाणवत राहिले कि हा चित्रपट मन्हजे डायरेक्टर च्या नजरेतून दाखवलेला खेळ.

गमतीदार गोष्ट मन्हजे चित्रपटाच्या शेवटी ए दिल हैं मुश्किल चे पोस्टर दिसते. काय संबद्ध हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे. कॅमेरा चे काम अतिशय विस्कळीत, मला समजत नाही कि जेव्हा तुम्हाला चेहर्या वरील भाव दाखवायचे असतील तेव्हा निदान कॅमेरा पात्र समोर ठेवा. तो साईड प्रोफाइल मध्ये आहे. राधा आणि आदित्य यांचा अभिनयाला मर्यादा आहेत, मला हे समजले नाही कि सारखे त्यांचे क्लोज उप का? आदित्य चे सारखे का?

चित्रपटाच्या सुरवातीला एक १९१० मध्ये रशियन डायरेक्टर एइजेस्टीने वापरलेले  मोंताज वापरलेले आहेत. मला हे काळात नाही की समाज बदलला, तंत्रज्ञानाची  झाली. फ्रेंच नु  वेव्ह, जर्मन एक्सप्रेसनिज्म, ब्रिटिश सिनेमा, युरोपिअन सिनेमा आणि बरेच काही झाले. जुने तंत्रज्ञान वापरून काय साध्य न होते? मला संपूर्ण चित्रपट हा मुख्यत्वे करून इनडोअर आहे. हा टीव्ही वरचा वाटतो.

एक सिनेमा चा अभ्यासक असल्या मुळे मला पडलेले हे प्रश्न मी  तुमच्या  समोर ठेवत आहे

No comments:

Post a Comment